नवापूर, जिल्हा परिषद चितवी गटातील अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित यांनी मतदारांचे मानले आभार...
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या गट क्रमांक 52 चितवी गटांमध्ये कैलासवासी सुरेश गावित यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. चितवी गटांमध्ये महाविकास आघाडीच्या पक्षांसमोर अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित यांनी आपली उमेदवारी निश्चित करून जोरदार टक्कर दिली. 5 जून रोजी शांततेत मतदान झाल्यानंतर 6 जून रोजी पोटनिवडणुकीची निकाल प्रक्रिया जाहीर झाली यामध्ये अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित यांना मतदारांनी 5305 मत देऊन आपलं प्रेम व्यक्त केलं. मतदारांनी मतदान पेटीतून दिलेल्या प्रेमापोटी रवींद्र गावित यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहे. पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी मतदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल रवींद्र गावित यांनी आभार मानत यापुढेही असंच सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या चितवी गटांमध्ये सुनिल सुरेश गावित यांना 7624 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावित यांना 5305 मत मिळाली. विशेष म्हणजे चितवी गटाच्या निवडणुकीत एकूण मतदानाच्या साडेचार टक्के नोटाला मतदान झाले आहे. 616 मतदारांनी नोटाला मतदान करून आपल्या मतदान...