Posts

Showing posts from November, 2022

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Image
नंदुरबार शहरातील नव्या भोईगल्लीत नगरपालिकेच्या वतीने सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन जि.प सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीने विविध विकास कामे करण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून शहरातील नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्या सभागृहाचे भूमिपूजन जि.प सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,पत्रकार हिरालाल चौधरी, नगरसेवक प्रमोद शेवाळे,जगन्नाथ माळी,माजी नगरसेवक किरण चौधरी,रामकृष्ण मोरे,जगन खेडकर,महादू हिरणवाळे, रामकृष्ण वाडीले,विनोद चौधरी,तुषार तावडे,भास्कर रामोळे,गणेश खेडकर त्याचप्रमाणे नवनाथ नगर,बालवीर चौक,आंबेडकर चौक,जुनी भोई गल्ली परिसरातील नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण मोरे तर सूत्रसंचालन महादू हिरणवाळे यांनी केले.