रघुवंशी परिवाराचे सामाजिक दातृत्वातून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पालिकेला २ शववाहिनी सुपूर्द
नंदुरबार( प्रतिनिधी)- येथील रघुवंशी परिवाराच्या सामाजिक दातृत्वातून नगरपरिषदेला २ शववाहिनी माजी आमदार तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी सुपूर्द केल्या. मृत व्यक्तीचे शव सुरक्षित रहावे यासाठी शववाहिनी उपयोगात आणली जाणार आहे. माजी आमदार,लोकनेते स्व. बटेसिंगभैय्या रघुवंशी व नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व.विमलताई बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मरणार्थ शवपेटी पालिकेस देण्यात आली. मृत व्यक्तीचे शव सुरक्षित रहावे यासाठी शववाहिनी उपयोगात आणली जाणार आहे. रघुवंशी परिवाराने सामाजिक दातृत्वातून पालिकेस २ शववाहिनी दिल्याने पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक परवेज खान, गजेंद्र शिंपी, फारूक मेमन, जगन माळी, चेतन वळवी, प्रीतम ढंडोरे, हिरालाल चौधरी, फरीद मिस्तरी, अतुल पाटील, प्रमोद शेवाळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रेम सोनार, शहर संघट...