नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...
नंदुरबार तालुक्यातील बामडोद येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एच पाटील, पाहणी दौरा प्रमुख प्राध्यापक हर्षराज अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली (फार्मसी) औषध निर्माण विभागात प्रशिक्षण घेणाऱ्या 46 विद्यार्थ्यांची नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नंदुरबार नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या शैक्षणिक पाहणी दौऱ्यादरम्यान सुरुवातीला नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांनी भेट दिली. दरम्यान नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी गोपाळ भोन कर यांनी विद्यार्थ्यांना औषध वितरण प्रणाली, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, औषधांमधली त्रुटी, औषधांची साठवणूक, खरेदी आणि बिलिंगची माहिती अमली पदार्थांच्या साठवणुकीसाठी घेतली जाणारी विशेष खबरदारी यासोबतच रुग्णालयातील कामकाज आयसीयू, आयसीसीयु इन पेशंट फार्मसी, पॅथॉलॉजी सेंटर, ऑपरेशन थिएटर आपत्कालीन सेवा ही सर्व प्रक्रिया कशी असते याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
*नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्राला भेट*
दुपारच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांकडून नंदुरबार नगरपालिका द्वारे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात पाहणी करून जल शुद्धीकरण प्रक्रिया कशी असते कोणकोणते पदार्थ रसायन पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरले जातात, पाण्याची साठवणूक तसेच स्वच्छतेनंतर शहरातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी कसे पोहोचवले जाते. याबाबत मुलांना जलशुद्धीकरण केंद्राचे सहाय्यक विनोद जाधव यांनी माहिती दिली.
एकूणच शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पाहणी दौऱ्यात नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थापनात हॉस्पिटल फार्मसी ची भूमिके बद्दल शिकण्याची संधी उपलब्ध झाली. तसेच मानवी शरीरात निम्म्याहून अधिक आजार दूषित पाण्याचे सेवन केल्याने होतात. नंदुरबार नगर पालिकेद्वारे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत शैक्षणिक धडे मिळाले.
या शैक्षणिक दौऱ्याचे प्रमुख प्राध्यापक हर्षराज अहिरे, प्राध्यापक दिनेश पवार, पूजा देशमुख विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी भाग घेतला होता. शैक्षणिक दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्षा योगिता पाटील, सचिव गणेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांच्या पाठिंब्यामुळेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल यशस्वी झाली.
Comments
Post a Comment