नवापूर तालुक्यात पाऊस व नद्यांना पुरामुळे शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू.
नवापूर शहरातील रंगावली नदीपात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या नागरिकांच्या संरक्षणाच्या हेतूने नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्णय नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या प्रशासनाने घेतला आहे. तरी नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले मौल्यवान सामान, महत्वाचे कागपत्रे, तसेच अन्य महत्वाचे साहित्यांसह सार्वजनिक हॉल, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार नगरपालिका टाऊन हॉल, अग्रवाल भवन आणि हनुमान वाडी या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे. नवापूर तालुका तहसीलदार मंदार कुलकर्णी व शिक्षणाधिकारी यांनी नवापूर तालुक्यातील सर्व शाळा प्रशासन आस्थापनांना सुट्टी देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. नवापूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांचे फरशी पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तालुक्यातील शाळांना...