Posts

Showing posts from April, 2023

रघुवंशी परिवाराचे सामाजिक दातृत्वातून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पालिकेला २ शववाहिनी सुपूर्द

Image
नंदुरबार( प्रतिनिधी)- येथील रघुवंशी परिवाराच्या सामाजिक दातृत्वातून नगरपरिषदेला २ शववाहिनी माजी आमदार तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी सुपूर्द केल्या. मृत व्यक्तीचे शव सुरक्षित रहावे यासाठी शववाहिनी उपयोगात आणली जाणार आहे.         माजी आमदार,लोकनेते स्व. बटेसिंगभैय्या रघुवंशी व नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व.विमलताई बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मरणार्थ शवपेटी पालिकेस देण्यात आली. मृत व्यक्तीचे शव सुरक्षित रहावे यासाठी शववाहिनी उपयोगात आणली जाणार आहे.            रघुवंशी परिवाराने सामाजिक दातृत्वातून पालिकेस २ शववाहिनी दिल्याने पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सत्कार केला. यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक परवेज खान, गजेंद्र शिंपी, फारूक मेमन, जगन माळी, चेतन वळवी, प्रीतम ढंडोरे, हिरालाल चौधरी, फरीद मिस्तरी, अतुल पाटील, प्रमोद शेवाळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रेम सोनार, शहर संघट...

नंदुरबार : गेल्या आर्थिक वर्षात एकूण 14 हजार 837 नवीन वाहनांची नोंदणी...

Image
वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून वायुवेग पथकाद्वारे 4 कोटी 4 लक्ष 63 हजार रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. वायुवेग पथकामार्फत धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक, हेल्मेटचा वापर न करणे इत्यादी विविध गुन्हे करणाऱ्या 5 हजार 683 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून उद्दीष्टाच्या तुलनेत ही रक्‍कम 192 टक्के आहे.  नवीन वाहन नोंदणी, एक रकमी कर, मालवाहू वाहनांचा वाहन कर, परवाना शुल्क, अनुज्ञप्ती शुल्क इत्यांदीच्या माध्यमातून 56.17 कोटी जमा झाली आहे. तर सीमा तपासणी नाका, नवापूर येथे आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या 49 हजार 298 वाहनांकडून 14 कोटी 38 लक्ष रूपये तसेच सीमा तपासणी नाका, गवाली, ता. अक्कलकुवा येथे 23 हजार 151 वाहनांकडून 5 कोटी 40 लक्ष रूपये वाहन कर व दंड या स्वरूपात वसूल करण्यात आले आहे. वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 14 हजार 837 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली, यात...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

Image
नंदुरबार तालुक्यातील बामडोद येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी एच पाटील, पाहणी दौरा प्रमुख प्राध्यापक हर्षराज अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली (फार्मसी) औषध निर्माण विभागात प्रशिक्षण घेणाऱ्या 46 विद्यार्थ्यांची नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नंदुरबार नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या शैक्षणिक पाहणी दौऱ्यादरम्यान सुरुवातीला नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांनी भेट दिली. दरम्यान नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी गोपाळ भोन कर यांनी विद्यार्थ्यांना औषध वितरण प्रणाली, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, औषधांमधली त्रुटी, औषधांची साठवणूक, खरेदी आणि बिलिंगची माहिती अमली पदार्थांच्या साठवणुकीसाठी घेतली जाणारी विशेष खबरदारी यासोबतच रुग्णालयातील कामकाज आयसीयू, आयसीसीयु इन पेशंट फार्मसी, पॅथॉलॉजी सेंटर, ऑपरेशन थिएटर आपत्कालीन सेवा ही सर्व प्रक्रिया कशी असते याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.   *नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्राला भेट* दुपारच्या क्षेत्र...

नंदुरबारात १२५ बेडचे छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन २२ एप्रिल रोजी होणार १ लाख लोकांची राहणार उपस्थिती

Image
नंदुरबार (प्रतिनिधी)-शहरातील बायपास रस्त्यावर जिल्ह्यातील सर्वात मोठ्ठे ४८ हजार स्केअर फुटमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन अक्षय तृतीयेच्या दिवशी २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या १ दिवशीय शिव चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील शहादा बायपास रस्त्यावर १२५ बेडचे छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहे. हॉस्पिटलचे उद्घाटन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी माजी आ.रघुवंशी यांनी रविवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद घेतली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,डॉ.तुषार रघुवंशी, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,डॉ. रोशन भंडारी, माजी सभापती कैलास पाटील उपस्थित होते. यावेळी माजी आ.रघुवंशी म्हणाले, अक्ष...