विसरवाडी, लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल लीनेश पाडवी, राजू कोकणी यांचा 5101 रुपयांचे बक्षीस देऊन गौरव...
कैलास पाडवी रिपोर्ट.
नवापुर तालुक्यातील पानबारा आश्रमशाळेतील चोरी झालेल्या 22 लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्याचा विसरवाडी पोलीसांनी दोन दिवसातच तपास करून चोरी झालेले लॅपटॉप हस्तगत केले होते. विसरवाडी पोलिसांच्या जलदगती कार्यवाही बाबत पानबारा शाळा प्रशासनानेही विसरवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला होता.
विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लॅपटॉप चोरीच्या गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल लीनेश पाडवी यांना पाच हजार एकशे एक रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच सहकारी पोलीस कॉन्स्टेबल राजू कोकणी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्याने कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहे. यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment