म्हसावद येथे एकाच रात्री सहा दुकाने फोडली.चोरट्यांनी पोलीसांपुढे शोध घेण्याचे कडवे आव्हान उभे केले.
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे चोरट्यांनी संधी साधत एकाच रात्रीतून सहा दुकाने फोडली. महिनाभरात हि दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात फोडलेल्या एका दुकानास दुसऱ्यांदा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला. खरे तर सहा दुकाने फोडण्यात आली असली तरी यातून एक रुपयाचीही चोरी झाली नाही. मात्र एका दुकानातून मोबाईल चोरीची नोंद करण्यात आली आहे. चोरट्यांनी केवळ शटर उचकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला की? अन्य काही ? याबाबत नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू होती. असे असले तरी सततच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली असून चोरट्यांनी पोलीसांपुढे शोध घेण्याचे कडवे आव्हान उभे केले आहे.
दुकाने फोडली पण चोरी झाली नाही. यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचे बोलले जात आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा धाडसी दुकान फोडी झाल्यावर म्हसावद पोलीसांचे गावातील रात्रीच्या गस्तीवर दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीतून सहा दुकाने फोडली पण चोरीच झाली नाही हा पण आश्चर्याचा भाग आहे. सहा दुकानात पैकी पाच हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरी झाल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने पोलिसात नोंद केली आहे.
Comments
Post a Comment