राज्याच्या शेवटच्या टोकावरील धडगाव शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवप्रेमींनी शिवरायांच्या जयघोषाने दणाणून सोडला आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरील धडगाव तालुक्यातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव साजरे करण्यावर शासनाचे निर्बंध असल्याने मुकावे लागत होते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पाचशे नागरिकांना एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याची परवानगी शासनाने दिल्याने सर्व ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
धडगाव शहरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने हनुमान मंदिराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला त्रिवार मुजरा करून "शिवाजी महाराज की जय" 'जय भवानी जय शिवाजी' असा जयघोष करून शिवजयंती साजरा करण्यात आली.
यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य दीपक कलाल, महेंद्र शिवदे, रमाकांत शिंपी, धनराज ढोले, रवींद्र तावडे, रवींद्र पोतदार, सुनील मोरे, जितेंद्र ढोले, हर्षल रामोळे, भरत साठे, रुद्रेश ढोले, हंसनी ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment