'शिव जयंती' रांगोळीच्या माध्यमातुन शिवाजी महाराजांची पाच हजार स्वेअरफिट मध्ये प्रतिमा साकारली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शहाद्यातील एका तरुणीने रांगोळीच्या माध्यमातुन शिवाजी महाराजांची पाच हजार स्वेअरफिट मध्ये प्रतिमा साकारली आहे. बी फार्मसी ची विद्यार्थीनी असलेल्या वैष्णवी पाटीले हिने शहादा कृषी उत्पन्न बाजारा समितीच्या आवारात तब्बल 96 तासांच्या मेहनतीनंतर हि प्रतिमा साकारली आहे. यासाठी तिने सहा ते सात क्विंटल रांगोळीचा वापर केला असुन चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर रागोळीचे चित्र पुर्ण झाले आहे. पहिल्यांदाच इथक्या मोठ्या प्रमाणात रांगोळीमधुन शिवरायांची प्रतिमा साकारली गेली असल्याने शिवप्रेमी देखील हि रांगोळी पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थिती लावत आहे.
Comments
Post a Comment