बी. जे. पावरा सरांचे "महाराष्ट्र सेट परीक्षेत मराठी विषयात" प्राविण्य यश संपादन, कौतुक व अभिनंदन.
नंदनगरीतील सातपुड्याच्या कुशीत वसलेले निगदी गावातील गरीब शेतकरी कुटुंबातील श्री. बी.जे.पावरा यांनी नुकत्याच सप्टेंबर महिन्यात झालेल्या राज्य स्तरावरील "महाराष्ट्र सेट परीक्षेत मराठी या विषयात" प्राविण्य मिळविले.
श्री भानुदास.जे.पावरा सर हे नंदुरबार येथील नंदुरबार तालुका विधायक समिती शिक्षणशास्त्र विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.तसेच ते अगोदर शिक्षणशास्त्र मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांनी दोन विषयांत एम.ए. केले आहेत,व केंद्रीय सी.टी.ई.टी. ,एम.एड्., डी. एस.एम. अशा विविध पदवी व पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. ते उत्कृष्ट तंत्रस्नेही म्हणून प्रख्यात आहेत. श्री भानुदास.जे.पावरा यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल नं.ता.वि. समितीचे अध्यक्ष मा.आ. चंद्रकांत रघुवंशी व उपाध्यक्ष मा. मनोज रघुवंशी, प्राचार्य श्री मुकेश रघुवंशी व समाजाच्या सर्वच स्तरावर कौतूक व अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment