बोरवण शाळेचे आदर्श शिक्षक दिलीप गावित यांचा अनोखा उपक्रम. शिक्षणासह स्वच्छतेचे धडे. विद्यार्थ्यांची केस कटिंग.



नवापुर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरवण येथे कार्यरत शिक्षक दिलीप गावित नेहमीच शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे काम करत आहे. कोरोना काळातही त्यांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासमाला देऊन शिक्षणाचा गाडा कायम राखला होता. एक फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या असून बोरवण गावातील अनेक विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोड, वीट भट्टी तसेच टोपल्या विणण्याचे काम करतात. हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांना शिकवण्याची धडपड असतानाच शाळेला दिलीप गावित सारखे आदर्श शिक्षक लाभल्याने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाचं मार्गदर्शन केले जात आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी नियमित नखे कापणे, दररोज सकाळी दात घासणे, आंघोळ करणे, मुलींनी केस विसरूनच शाळेत यावे याबाबत मार्गदर्शन केले विशेष म्हणजे शाळेत आलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे केस जास्त वाढलेले होते. त्या विद्यार्थ्यांचे शिक्षक दिलीप गावित यांनी शाळेतच केस कटिंग करून विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. शिक्षक दिलीप गावित यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन