शिरपूर, कोडीद येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

 


महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक 'युगपुरुष', रयतेसाठी आयुष्य वेचणारे, अन्यायाविरूद्ध लढा देणारे, कुशल प्रशासक व आदर्श राज्यकर्ते,  स्वराज्य संस्थापक, अखंड भारताचे आराध्यदैवत, शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व त्यांचा इतिहास विसरता कामा नये. त्यांनी केलेलं कर्तृत्व आणि त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आपण सर्वांनी अविरतपणे काम करावे 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व सर्वप्रथम जगासमोर आणण्याचे काम महात्मा जोतीराव फुले यांनी केले.

त्यांनी रायगडावरील महाराजांची समाधी शोधून काढली पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली.  त्यांचे हे कार्य अविरत पुढे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. स्वराज्याची आदर्श कल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. त्यांनी केलेले कार्य सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे.

    हीच प्रेरणा घेऊन कोडीद ता.शिरपूर येथे दरवर्षीप्रमाणे आज "शिवजन्मोत्सव" साजरा करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन