चोरीला गेलेल्या २२ लॅपटॉपचा दोन दिवसात छडा लावल्याने शाळेतर्फे विसरवाडी पोलिसांचा सत्कार.


गुन्ह्यातील आरोपी सापडत नसेल तर पोलिसांना दोष दिला जातो.एखाद्या गुन्ह्याचा उकल तात्काळ केल्याने पोलिसांचे कौतुक देखील झाले पाहिजे या उद्देशाने पानबारा शालेय प्रशासनाने पोलिसांचे कौतुक केले. नवापुर पोलिसांनी तीन जिल्हा परिषद शाळेतील चोरीचा अजून शोध लावला नाही त्यांनी देखील विसरवाडी पोलिसांचा आदर्श घेत शोध लावावा अशी चर्चा शैक्षणिक क्षेत्रात बोलली जात आहे. 

नवापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा येथे 12 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्री सोनखांब अनुदानित आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेतील 21 लॅपटॉप लंपास केले होते. आश्रम शाळेतील मुख्याध्यापक सह शिक्षक कर्मचारी चिंतेत होते. मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने सहाजिकच शिक्षकांची चिंता वाढली होती. या दरम्यान विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी आश्रम शाळेतील शिक्षकांना दोन दिवसात तुमचे लॅपटॉप शोधून देतो. असे आश्वासन दिल्याने दोन दिवसातच विसरवाडी पोलिसांनी लॅपटॉप चोरट्यांचा शोध घेत कारवाई पार पडल्याने पानबारा आश्रम शाळेतील मुख्याध्यापक पी. पी. वसावेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विसरवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे यांच्यासह विसरवाडी पोलीसांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी पी वसावे, अधीक्षक एल बी साळुंखे ,विजय जगताप ,शिक्षिका अरुणा गावित,वंदना गावित, शिक्षक महेश पाटील, चतुर्थ कर्मचारी आम-या कोकणी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन