दलेलपूर माध्यमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिवजयंती उत्साहात साजरी.
तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान द्वारे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आदरपूर्वक भाषण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडलेत.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील गाण्यांवर नृत्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणला.
सदर कार्यक्रमाला उपस्थित शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राजु प्रधान, सदस्य संतोष मराठे, अजय धानका कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यधापिका सोहनी मॅडम, शिक्षक वृंद व पालक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन महाजन सरांनी केले तर लिवा तडवी सरांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment