नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भव्य दंत व सर्व रोग निदान शिबीर संपन्न
नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भव्य दंत व सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन देवमोगरा मातेचे पुजन करुन व दिप प्रज्वलन करुन नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ हिना गावीत,आमदार विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नंदुरबार जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ मनिषा खञी,तहसिलदार मंदार कुलकर्णी,जिल्हा शल्यचित्सक डॉ चारुदत्त शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोविद चौधरी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनिषा वळवी,नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ शशीकांत वसावे,भाजपचे जिल्हा अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,कृणाल दुसाने,सौरव भामरे आदी उपस्थित होते. प्रसंगी खासदार डॉ हिना गावीत म्हणाल्या की कोणत्याही आजाराची तपासणी केली पाहीजे.यामुळे आपल्याला कोणता आजार आहे हे समजते.पाले भाज्याचे सेवन केल्याने रक्तवाढ होत असते नंदुरबार जिल्हात कुपोषणचे प्रमाण जास्त असल्यामुळे अशा रुग्णानी वेळो वेळी वैद्यकीय तपासनी करणे गरजचे आहे.गरोदर मातानी आपले नाव प्रामथिक आरोग्य केंद्रात नाव नोंदवले असता त्यांना शासनाकडुन ६ हजार रुपये शासन देण्याची योजना आहे.आपल्या नंदुरबार जिल्हातुन कुपोषण हद्द पार करायच आहे.जे मुलाचे लग्न झालेले नसले त्यांनी सिकलसेलची तपासनी करुनच लग्न करावे यामुळे पुढे होणारे आजार होणार नाही.सिकलसेल पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून सिकलसेल तपासणी करणे गरजचे आहे.डायबीटसी,उंच्चरक्तदाबाचे प्रमाण पण शहरा पेक्षा ग्रामिण भागात पण जास्त होत आहे.याची पण तपासणी करणे गरजेचे आहे.म्हणून प्रत्येक रुग्णानी अशा सर्व रोगनिदान शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन खासदार डॉ हिना गावीत यांनी केले आहे.या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ प्रमोद कटारीया यांनी केली तर सुञसंचलन समुपदेशक के़ैलास माळी यांनी केल तर आभार डॉ शशीकांत वसावे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ युवराज पराडके,डॉ रेचल वळवी,डॉ अमोल वळवी,डॉ कुंदन ब्रेद्रे,डॉ प्रती गावीत,डॉ राज भुसावरे,डॉ प्रदिप गावीत,डॉ सुनिल गावीत,सह नवापूर उपजिल्हा रुग्ण्लयाचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.या नंतर मोबाईल कोविड वैक्सीन वाहनाचे उद्घाटन हिरवी झेडी दाखवुन उपस्थित मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.
Comments
Post a Comment