तळोदा तालुक्यातील धवळी विहीर जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शिक्षण परिषद संपन्न

केंद्र तळोदा अंतर्गत सर्व शाळांची शिक्षण परिषद माहे फेब्रुवारी 2022 जिल्हा परिषद शाळा धवळी विहीर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. परिषदेचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सपनाताई वसावे यांनी भूषवले. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी माननीय श्री शेखर धनगर साहेब व केंद्रप्रमुख श्रीमती जयस्वाल मॅडम उपस्थित होत्या. तसेच श्री सुकलाल पावरा(केंद्रप्रमुख,केंद्र चीनोदा), श्री जगन्नाथ मराठे( केंद्रप्रमुख ,केंद्र मोदल पाडा), ज्ञानप्रकाश फाऊंडेशन प्रतिनिधी ,श्री पवार सर( गटसाधन केंद्र,तळोदा)  उपस्थित होते.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

  उपस्थित सर्वांचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशा व लेझीम पथकाने नृत्याविष्कार दाखवत स्वागत केले. तसेच ईशस्तवन व स्वागत गीत कृतीयुक्त गितातून घेण्यात आलेत.

    जिल्हास्तरावरून दिलेल्या नियोजनानुसार शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच चर्चा घडवून आणण्यात आली. माननीय धनगर साहेब यांनी विद्यार्थी आनंदात शिक्षण घेतील, त्यांना शाळा सर्वाधिक सुरक्षित व आनंदमय वाटेल असे वातावरण तयार करा असा संदेश दिला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल सोनवणे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती लक्ष्‍मी देवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी माननीय मुख्याध्यापक श्री प्रतापसिंग वळवी सर, शिक्षक वृंद श्री अवतार सिंग पाडवी, श्रीमती कल्पना चौधरी, श्रीमती इंदिरा पाडवी, श्री विक्रम गदळे, श्री पांडुरंग दुधे व श्री खाआल्या वळवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मंडप, सुशोभीकरण यासाठी पालक श्री दारासिंग वसावे, श्री निलेश वसावे यांनी अनमोल  सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन