नंदुरबार, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन...

नंदुरबार जिल्हा परिषद क्रीडा उत्सव 2022 मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित मैदानी विविध खेळांच्या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एडहोकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, माध्यमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर युनूस पठाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत  दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 


मैदानी खेळांमध्ये जिल्हा परिषद मुख्यालय व सहा तालुक्यांच्या स्पर्धा भरवण्यात आल्यात त्यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, 100 मीटर 400 मीटर 800 मीटर  धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या व दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद मुख्यालय येथे घेण्यात येऊन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात येणार आहेत. सदर मैदानी खेळ खेळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन