नवापूर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने शिवजयंती साजरी. १०४ वा दु:खवटा दिवस
संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या साडेतीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्र शासनात एसटी कर्मचारी विलीनीकरणासाठी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपात महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या महत्त्वाच्या नवापूर बस बसस्थानकातील एसटी कर्मचारी देखील या संपात सहभागी आहे गेल्या साडेतीन महिन्यात प्रत्येक सण, उत्सव जयंती, पुण्यतिथी या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी साजरे केले आहे.
आज महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लढाऊ व शूरवीर प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कष्टकऱ्यांचा दुखवटा देखील साजरा केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर संपकरी ठाम असून कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.
शिवजयंती साजरी करुन छत्रपती प्रमाणे लढाऊ व शूरवीर शक्ती आम्हालाही प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना कर्मचाऱ्यांनी केली आहे.
यावेळी वरिष्ठ कर्मचारी आहिरे मामा, कैलास वळवी, जगशिग वळवी, विवेक वसावे, महादेव आत्राम, महादेव कराड, मनोज गावित, रवी मराठे सचिन महाजन, सुरेश कोकणी, अन्वर वळवी, तिडके. आदी कर्मचारी उपस्थित होते. सदर शिवजयंती कार्यक्रमाची व्यवस्था दुलाजी गावित व आहिरे मामा यांनी पार पाडली.
Comments
Post a Comment