नंदुरबार, भाजपकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पुतळ्याचे दहन...
नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मुख्य चौकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पुतळ्याचे दहन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. देशद्रोही दाऊद इब्राहिम प्रेरित महाविकास आघाडी सरकार मधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करून अटक केल्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे. राज्यात एसटी कर्मचारी तसेच रोजगार, मजूर कष्टकरी यांचे मोठे प्रश्न असतानाही महाविकासआघाडी सरकार मधील दोषी मंत्र्यांना अटक केल्यानंतर रस्त्यावर येतात हे दुर्दैव आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरूंगात आहे. महा विकास आघाडी सरकार मधील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरत आहे. याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी यावेळी दिली.
Comments
Post a Comment