नंदुरबार तालुक्यातील 59 लाभार्थ्यांना सिंचन विहीर व गोठयांच्या मंजुरी आदेशांचे वाटप; 1 कोटी 82 लाखांच्या लाभ. योजनेच्या माध्यमातून विकास करावा-माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

सामाजिक जीवनात काम करीत असतांना कुठलीही अपेक्षा लोकप्रतिनिधींनी न  बाळगता कामे करावीत.पंचायत समितीची सर्व टीम उत्तम कामगिरी करीत आहे. योजनांच्या माध्यमातून जनतेच्या विकास करावा असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

नंदुरबार तालुक्यातील 59 लाभार्थ्यांना सिंचन विहीर व गोठयांच्या मंजुरीचे आदेश सोमवारी माजी आ. रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं.स आवारातील शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्यास माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.


यावेळी माजी आ. रघुवंशी म्हणाले,कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची कामे करायला पाहिजे. पंचायत समितीची सर्व टीम उत्तमपद्धतीने कामगिरी करीत आहे. योजनांच्या माध्यमातून लोकांचा विकास करावा.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी,पं.स उपसभापती कमलेश महाले,जि.प सदस्य देवमन पवार, जि.प माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,माजी जि.प सदस्य डॉ. सयाजीराव मोरे,जि.प सदस्य प्रतिनिधी सुरेश शिंत्रे, नगरसेवक दीपक दिघे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे,पं.स तेजस पवार,धर्मेंद्र परदेशी, संतोष साबळे,प्रल्हाद राठोड, सुनील वसावे,अंबु पाडवी,श्रीमती बायजाबाई भिल,कलाबाई भिल,अंजना वसावे आदी उपस्थित होते.


या गावातील लाभार्थ्यांच्या समावेश

तालुक्यातील घोटाणे,दुधाळे,खोक्राळे,भोणे,सुंदरदे,वेलवड,भालेर, ठाणेपाडा,वासदरे या गावातील 59 पात्र लाभार्थ्यांना सिंचन विहीर व गोठयांच्या मंजुरीचे आदेश देण्यात आले. 59 लाभार्थ्यांना 1 कोटी 82 लाख 17 हजार 500 रूपयांच्या योजनेच्या लाभ झाला.

अनुपस्थित गटविकास अधिकाऱ्यांवर नाराजी

सिंचन विहिरी व गोठे मंजुरी आदेशाच्या कार्यक्रमाप्रसंगी गटविकास अधिकारी वळवी उपस्थित नसल्याने माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नाराजी व्यक्त केली.उप सभापतींनी सूचना करून देखील गट विकास अधिकारी जनहिताच्या कामाला उपस्थित राहू शकत नसल्याने मान्यवरांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन