अक्कलकुवा दाब येथील आदिवासी कुलदेवता याहामोगी मातेचे दर्शन. खासदार, आमदार जि.प. अध्यक्ष व सदस्यांसह भाविकांची उपस्थिती.
अक्कलकुवा तालुक्यातील दाब येथील आदिवासी कुलदेवता याहामोगी देवस्थान परिसरात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर होब यात्रेची सुरुवात करून भाविका द्वारे दर्शन घेण्यात आले यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी सहभागी झाले होते.
यात्रेनिमित्त दाब येथील याहा मोगी माता परिसरातील मंदिराला रंगरंगोटी करून आकर्षक रोषणाई ने सजावट करण्यात आली होती. आदिवासी पारंपारिक रुढी-परंपरा प्रमाणे विधीवत पूजा करण्यात आली.
यावेळी सागबारा येथील पेंटर कांतीलाल यांनी काढलेली याहामोगी मातेच्या पोस्टरचे प्रदर्शन जिल्हा परिषद अध्यक्ष एडवोकेट सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त आदिवासी कुलदेवता याहा मोगी मातेच्या दर्शनासाठी भाविकां सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष एडवोकेट सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद सदस्य सी.के. पाडवी, सुहास नाईक, डॉ. सुप्रिया गावित, सरपंच धनसिंग वसावे, अमृत वळवी, डॉ. दिलावर वसावे, एडवोकेट सरदार वसावे, डॉ. जितू वसावा, डॉ. शातीकर वसावा, करमसिंग पाडवी व परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment