तळोदा, रावलापाणी इंग्रज सैनिकांच्या बेछूट गोळीबारात शहीद झालेल्यांना आदिवासी बांधवांकडून सामूहिक श्रद्धांजली...
भारत स्वातंत्र्याचा लढाईत इंग्रज सैनिकांच्या अमानुष गोळीबाराची साक्ष म्हणून रावलापाणी येथील निझरा नदीपात्रातील दगडावर असलेल्या गोळीबाराच्या खुणा येथील समाज बांधवांनी आजही जतन करून ठेवल्या आहेत. येथील वातावरणात आजही एक प्रकारचे देशप्रेम, स्वातंत्र्या बद्दलची ओढ, भक्ती आणि त्याच सोबत निडरता आजही ठासून भरल्याचे जाणवते.
आजच्या दिवसाची आठवण म्हणून या ठिकाणी दर वर्षी २ रोजी आप धर्माकडून व आदिवासी बांधवांकडून सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतो. यावर्षी मोठ्या उत्साहात सामुहिक पद्धतीने शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
रावलापाणी येथिल या घटनेला आता 80 वर्ष पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने या शहीद वीरांची आठवण चिरस्मरणात राहावी व समाजातील तरुणांसाठी एक प्रेरणा स्थान निर्माण व्हावे म्हणून एक भव्य स्मारक होणे गरजेचे आहे.
रावलापाणी येथील शहीद वीरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.
Comments
Post a Comment