नंदुरबार, जिल्ह्यातील सातपुडा परिसरात आजपासून होळी उत्सवाला सुरुवात होईल...
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात आज १३ मार्चपासून होळी उत्सवाला सुरुवात होत असून आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या देवाची होळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाब अर्थात हेलो दाब येथील मोरी-राही पाडा येथील होळी पेटवून या चैतन्यमयी महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या या होलिकोत्सवसाठी यंदा आबालवृद्धांसह तरुण-तरुणींसह सर्वांनी तयारी सुरू केली आहे. आदिवासी समाजात होळी सणाला मोठं महत्त्व आहे, होळी सणानिमित्त बाहेरगावी रोजगारासाठी गेलेले बांधव परत आपल्या गावी येऊन होळी सण साजरा करतात. होळीनिमित्त शेतीत व घरात भरभराटी यावी यासाठी नवस घेऊन ५ व सात ते नऊ दिवस (पाळणी) अर्थात पूजा विधी करून होळी सणात कमरेला घुंगरू डोक्यावर मोरपीस मोरखी, बावा बूध्या, डानका डोको, होळी सेवेकरी मोरखी, अशी वेशभूषा परिधान करून सोंग म्हणजेच पारंपारिक नृत्य सादर करून होळी सणात सहभाग घेतात.
आदिवासींचे कुलदैवत याहामोगी मातेचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक हेलो दाब अर्थात डाब येथील देव होळी साजरी करून 13 मार्च ते 21 मार्च पर्यंत विविध गावांमधील नवसाच्या होळी उत्सव सुरू राहणार आहे.
सातपुड्यातील अक्कलकुवा, धडगाव, तळोदा तालुक्यातील होळी सण वेळापत्रक
(1) दिनांक 13/3/2022
अक्कलकुवा तालुक्यातील
दाब
(2) दिनांक 14/3/2022
धडगाव तालुक्यातील
काकडपाटी, बदला, पानबारी,
पाडली, गोरबा
(गोरबा येथे सकाळी मेलादा बाजार)
तळोदा तालुक्यातील
कालीबेल
(३) दिनांक 15/3/2022
धडगाव तालुक्यातील
गोऱ्या, मोख खुंटामोडी
अक्कलकुवा तालुक्यातील
बडीऀ
(4) दिनांक 16/3/2022
अक्कलकुवा तालुक्यातील
उर्मिलामाळ
धडगाव तालुक्यातील
कालीबेल, अस्तंबा, वावी
तळोदा तालुक्यातील
कोठार
(५) दिनांक 17/3/2022
अक्कलकुवा तालुक्यातील
काठी राजवाडी होळी
धडगाव तालुक्यातील
मांडवी, सुरवाणी, सिसा, धडगाव
(मांडवी, सुरवाणी येथे सकाळी मेलादा बाजार)
(६) दिनांक 18/3/2022
अक्कलकुवा तालुक्यातील
मोलगी
धडगाव तालुक्यातील
काकडदा, तलाई
(मोलगी येथे मेलादा बाजार)
(7) दिनांक19/3/2022
अक्कलकुवा तालुक्यातील
जामली
धडगाव तालुक्यातील
असली
(जामली, असली येथे सकाळी मेलादा बाजार)
(8) दिनांक 20/3/2022
अक्कलकुवा तालुक्यातील
जमाना
धडगाव तालुक्यातील
धनाजे
(जमाना, धनाजे येथे सकाळी मेलादा बाजार)
(9) दिनांक 21/3/2022
धडगाव तालुक्यातील
भुगवाडा
(भुडवाडा येथे सकाळी मेलादा बाजार,)
सातपुड्यातील होळी उत्सवाला मोठं ऐतिहासिक महत्त्व असून हा महोत्सव बघण्यासाठी जिल्ह्यासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून नागरिकांची गर्दी होते.
जिल्ह्यातील सातपुडा व्यतिरिक्त सपाटी भागात नंदुरबार व नवापूर, शहादा तालुक्यात शहरी भागात 17 मार्चला होळी सण साजरा केला जाईल तर ग्रामीण भागात काही गावांमध्ये 17 मार्च व काही गावांमध्ये 18 मार्च रोजी होळी सण साजरा केला जाणार आहे. ग्रामीण भागांमध्ये होळी पेटवल्यानंतर पुढील पाच दिवस गेर सोंग काढून गावागावांमध्ये नाचगाणे करून होळी सण साजरा करण्याची परंपरा आहे.
Comments
Post a Comment