जनसेवा हिच ईश्वरसेवा डॉ. उल्हास वसावे. निशुल्क वैद्यकीय शिबीर

आश्रय दुर्ग संस्था, निम्स रुग्णालय नंदुरबार, आशीर्वाद क्लिनिक - म्हसावद तसेच ग्रेस हॉस्पिटल, करंजी (खुर्द) नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देवलीमाडी सर्वो ऑटोमोबाइल्स, इंडियन ऑइल पेट्रोल पंप, आमलीपाडा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, विसरवाडी, ता. नवापूर, जि नंदुरबार येथे दि. १४ मार्च २०२२ निशुल्क वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक रुग्णांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली व निशुल्क औषधांचा फायदा घेतला. 


शिबिरात डॉ. तपन भावसार (जनरल सर्जन), डॉ. सिद्धी पाटील, डॉ. समीर चौधरी,  डॉ. प्रवीण गावित, डॉ. श्रीराम व डॉ. संतोष चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करून औषोधोपचार केले. या शिबिराचे वैशिष्ठ म्हणजे आशीर्वाद क्लिनिक - म्हसावद यांच्या तर्फे एक्स- रे ची गाडी उपलब्ध करून देण्यात आली होती व बऱ्याच रुग्णांचा निशुल्क एक्स-रे करण्यात आला.


शिबिरातसाठी विक्रम गावित, अतुल गावित, अंकुश वसावे (फार्मासिस्ट), अर्पणा गावित (नर्स), अर्चना वसावे (नर्स), रोशनी गावित (नर्स), भीमसिंग व्हावीत, सुनीत गावित, विशाल ठाकरे व महेश गोसावी यांनी संपूर्ण व्यवस्था करून मदत केली. 

शिबिरासाठी आलेल्या सर्व टीमसाठी यु व्ही'ज फूड्स यांनी भोजनाची व्यवस्था करून सहकार्य केले.


शिबीराकरिता ज्या व्यक्ती व संस्थांनी मदत केली त्या सर्वांचे आश्रय - दुर्ग संस्थेचे अध्यक्ष श्री. जयंत जे वसावे, श्री. के. टी. गावित (संचालक - देवलीमाडी सर्वो ऑटोमोबाइल्स, इंडियन ऑइल पेट्रोल पंप) व डॉ. शिरीष शिंदे (संचालक - निम्स रुग्णालय, नंदुरबार यांनी आभार व्यक्त केले. शिबिराचा फायदा घेतलेल्या रुग्णांनी या सेवेबद्दल समदं व्यक्त केले. 


परिसरातील गोर-गरीब रुग्णांना वेळोवेळी वैद्यकीय सुविधा आपल्या गाव-पाड्याजवळच उपलब्ध व्हाव्या म्हणून याच प्रकारचे शिबीर दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी देवलीमाडी सर्वो ऑटोमोबाइल्स, इंडियन ऑइल पेट्रोल पंप येथेच आयोजित केले असल्याची माहिती श्री. विक्रम गावित व श्री. सुनील गावित यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.

Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन