भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाअंतर्गत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दहावी, बारावी व त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता ऑनलाईन प्रणालीद्वारे घरी राहुन, भाडेतत्वावर खोली घेऊन ऑनलाईन शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून 28 फेब्रुवारी 2022 पर्यत अर्ज मागविण्यात आले होते.
आता योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी आपले अर्ज 31 मार्च 2022 पर्यत सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Comments
Post a Comment