नवापूर, घरी फिश टॅंक मध्ये चार कासवांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी नवापूर वन विभागाची कारवाई...

नवापूर शहरातील जुनी महादेव गल्ली रहिवासी विशाल सुनील पिसे यांनी आपल्या घरात काचेच्या फिश टॅंक मध्ये चार कासवांना बंदिस्त ठेवल्याप्रकरणी नवापूर वन विभागाने कारवाई केली असून भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये विशाल सुनील पिसे यांच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल नवापूर व चिंचपाडा रेंज स्टाप च्या वतीने विशाल सुनील पिसे राहणार जुनी महादेव गल्ली नवापूर यांच्या घराची सर्च ओरडणे झडती घेतली असता सदर इसमाच्या घरी काचेच्या फिश टॅंक मध्ये तीन विदेशी प्रजातीचे कासव व एक भारतीय प्रजातीचे कासव असे चार जिवंत कासव आढळून आल्याने आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदर कारवाई म धनंजय ग. पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल नवापूर प्रा. शिवाजी रत्नपारखे वनक्षेत्रपाल चिंचपाडा श प्रादेशिक वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रा. व चिंचपाडा प्रा. यांच्या पथकाने केली.

 

म. सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठालाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करून वन विभागाला माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन