नंदुरबार नगरपालिका शिवसेना-भाजपा मध्ये पत्रकबाजीचे वार सुरुच..जनतेचा गैरसमज करायचे थांबवा व विकासचे वाटेकरी व्हा!
विजूभाऊ, होय मीच श्री.चंद्रकांत रघुवंशींना वसुली विभागाचा बैटीकीला सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते. होय मीच प्रभारी मुख्याधिकारी श्री. थोरात रावसाहेब यांना सुध्दा वसुली विभागाचा मिंटीगमध्ये येण्यासंदर्भात सुचित केले होते, श्री. चंद्रकांत रघुवंशींच्या नेतृत्वाखालीच आम्ही नंदुरबार नगरपरिषदेत प्रचंड बहुमतांनी विजयी झालो.
आमच्या नेत्याचा नेतृत्वातच आम्ही आपला पराभव करु शकलो. नंदुरबार नगरपरिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या सगळया चांगल्या-वाईट कामांची जबाबदारी सुध्दा आमचीच आहे, याची आम्हाला जाणीव आहे. नंदुरबार नगरपरिषदेने जर घरपट्टी व पाणीपट्टी वसुल केली नाही तर भविष्यात अनुदान सुध्दा नगरपरिषदेला शासनाकडून मिळणार नाही. आणि यामुळे आम्ही वसुली संदर्भात बैठक घेतली होती व आमचे नेते मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांना सुध्दा आमंत्रीत केले होते.
नंदुरबार नगरपरिषदेची यावर्षी निवडणूक असल्याने तुम्ही जनतेची दिशाभूल करुन विकासकामांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहात, याची सुध्दा जनतेला कल्पना आहेच. तुम्ही यापूर्वी सुध्दा घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी केली होती. त्यावेळेस सुध्दा आमचे नेते चंदुभैय्या यांनी आपल्याला आव्हान केले होती की, भारतीय जनता पक्षाच्याखालील काम करत असलेल्या किंवा महाराष्ट्रतील कुठल्याही नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी माफ केलेली असेल तर तुम्ही आम्हाला कळवा, त्या नगरपरिषदेला आपण सर्व मिळून भेट देऊ व त्या नगरपरिषदे प्रमाणे आपणही आपल्या जनतेला न्याय देऊ. परंतु ते आव्हान तर आपण स्वीकारले नाहीच परंतु आपण चंदुभैय्यांचा उपस्थितीवर प्रश्न विचारले. आपण हे विसरलात की फक्त आणि फक्त एकच वर्ष नंदुरबार नगरपरिषदेची सत्ता आपल्या ताब्यात होती व त्यातही आदरणीय श्री. हिरालाल काका, सौ. इंदू काकु यांच्या शेजारी बसुन नगरपालिका चालवीत होते. हे आपण विसरलात नगरपरिषद सर्वसाधारण सभेत सुध्दा काकासाहेब उपस्थित राहायचे, परंतु आमचे नेते चंदुर्भय्या आजपर्यंत आमच्यावर विश्वास असल्याने नगरपरिषदेमध्ये किंवा सर्वसाधारण सभेमध्ये कधीच आले नाहीत. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नंदनगरीचा जनतेला न्याय देण्याचे काम तसेच शहराचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
कृपया जनतेचा गैरसमज करायचे थांबवा व विकासचे वाटेकरी व्हा! एवढीच मी आपल्याला विनंती करतो. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी सुध्दा प्र. नगराध्यक्षांचा घेतलेल्या मिटींगला उपस्थित राहणे तेही वसुली सारख्या विषयावर क्रमप्राप्त आहे आणि म्हणून त्यांना निलंबित करा, अश्या बालिशपणाची मागणी आपल्या सारख्या जबाबदार व्यक्तीकडून अपेक्षित नाही. धन्यवाद !
Comments
Post a Comment