शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; कार्यकर्त्यांचा सत्कार गाव तिथं शाखा उघडणार; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यात महानगरप्रमुख,उपजिल्हा संघटक,तालुकाप्रमुख,तालुका संघटक,प्रसिद्धी प्रमुखाच्या समावेश आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केला. जिल्ह्यात गाव तिथं शिवसेनेची शाखा स्थापन करण्याचा मनोदय रघुवंशी यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रभारी नियुक्त्या जाहीर झाले आहेत. सदर नियुक्त्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रभारी करण्यात आलेल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सदर नियुक्त्या कायम करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पदाधिकार्यांच्या सत्कार केला. ते म्हणाले, जिल्ह्यात गाव तिथे शिवसेनेच्या शाखा उघडून घराघरात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचणार. यावेळी जि.प उपाध्यक्ष राम रघुवंशी, नगरसेवक किरण रघुवंशी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक जगन माळी, माजी नगरसेवक मोहन माळी, चेतन वळवी आदी उपस्थित होते.
नंदुरबार महानगर प्रमुख विजय माळी, उपजिल्हा संघटक मनोज बोरसे, नवापूर विधानसभा प्रमुख मगन वसावे, नंदुरबार तालुका प्रमुख रवींद्र गिरासे, नवापुर तालुका प्रमुख बकाराम गावित, तालुका संघटक देवका पाडवी, शहादा तालुका संघटक गणेश चित्रकथे,प्रसिद्धीप्रमुख प्रा. रवींद्र गुरव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment