चिंचपाडा चर्च कौन्सिलचे ५१ वे तीन दिवसीय तरुण संमेलन भोमदीपाडा येथे संपन्न...

नवापुर तालुक्यातील चिंचपाडा दी   ईव्हेन्जेलिकल अलायन्स ख्रिश्चन चर्च चिंचपाडा झामणझर व पिंपळनेर अंतर्गत 51 वे तीन दिवसीय तरुण संमेलन भोमदीपाडा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. गेल्या दोन वर्षात कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे सदर तरुण संमेलन होऊ शकले नव्हते; परंतु यंदा कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाच्या निर्देशानुसार चिंचपाडा, झामणझर व पिंपळनेर येथील तब्बल ३० पेक्षा अधिक मंडळींनी या तरुण संमेलनामध्ये सहभाग नोंदवला होता. 

51 वे संयुक्त तरुण संमेलनात मार्गदर्शनासाठी धानोरा-ईसाईनगर येथील पास्टर रविकांत गावीत हे प्रमुख वक्ते होते. तीन दिवसीय शिबिरात गावित यांनी संमेलनाचे ब्रीदवाक्य मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्याकडे लक्ष ठेव. यासह बायबल मधील विविध वचनाद्वारे उपस्थितांना शिक्षण दिले. यासोबत तरुण संमेलन कमिटीच्या वतीने सांघिक गायन स्पर्धा,  बायबल क्विज स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या तरूण मंडळींना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.‌ सदर संमेलनासाठी भोमदीपाडा येथील ख्रिस्ती मंडळीने पुढाकार घेऊन तीन दिवसासाठी शिबिरात आलेल्या नागरिकांना राहण्याची, जेवणाची सोय करून सेवा केली. तरुण संमेलन कमिटीच्या वतीने भोमदीपाडा मंडळीचेदेखील स्वागत करून आभार मानण्यात आले. सदर तीन दिवसीय संयुक्त तरूण संमेलनासाठी परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वचनाचा बोध घेतला. 

51 वे तीन दिवसीय संयुक्त तरुण संमेलन यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष सतीश वळवी, उपाध्यक्ष रॉबर्ट वसावे, खजिनदार शीतलकुमार वसावे, सचिव विनायक गावित, रॉबिन गावित, सल्लागार अविदास गावीत व स्वीकृत सदस्य यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले. 


Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन