नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे वयाच्या 88 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधननऊ वेळा खासदार पद भूषविणारे काँग्रेसचे नेते
नंदुरबार: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी फुप्फुसांचा आजार होता. नाशिकमधल्या खाजगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
माणिकराव गावित हे तब्बल नऊ वेळा खासदर म्हणून संसदेत निवडून गेले होते. त्यांनी देशाचे गृहराज्य मंत्रिपदही भूषवलं होतं. त्यांच्या सुपूत्री निर्मला गावित या इगतपुरीच्या माजी आमदार आहेत. तर त्याचे पुत्र भरत गावित हे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. माणिकराव गावित यांच्या पार्थिवावर उद्या नवापूर येथे अत्यसंस्कार होणार आहेत.
माणिकराव गावित यांचा जीवनप्रवास:
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झाले. १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून ते सदस्य म्हणून निवडून आले. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून ते निवडून आले, तर १९८० साली ते नवापूरचे आमदार झाले.
माणिकराव गावित हे प्रथम १९८१ साली खासदार झाले, त्यावेळी त्यांचे ४७ वय होते. तेव्हापासून ते आतापर्यंत ते तब्बल ९ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. १९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १.३०७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळविणाऱ्या टॉप १० खासदारांमधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झालेत.
Comments
Post a Comment