व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक
2022- 2023 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य श्रीमती प्राची वाजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचीत राहू नये म्हणून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याने ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही. अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीच्या दाखला प्राप्त केला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्वरीत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. Kailas Padvi Report
Comments
Post a Comment