पती पत्नी नातं जुळल्या रेशीम गाठी महिला समुपदेशन केंद्र व अक्कलकुवा पोलिसांची कामगिरी
अक्कलकुवा: पती-पत्नी मधील वाद विकोपाला गेला की दोघांमधे विश्वास कमी होतो. दुरावा निर्माण होतो. मग याने माझा कसा छळ केला. तिने माझे कुटुंब आणि आई -वडील यांना कसा त्रास दिला. सर्व उणे दुणी सार्वजनिक होतात. त्यात मुलांचे होणारे नुकसान, वेळ, पैसा आणि होणार्या मनस्तापचा हिशोब कधीही जुळत नाही. संसार सुखाचा होण्यासाठी आणि विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत होण्यासाठी समुपदेशन हा पर्याय सध्या उपलब्ध आहे. असे मत अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग मान्यता प्राप्त आणि महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत अक्कलकुवा पंचायत समिती येथे सुरू असलेल्या महिला समुपदेशन केंद्रातर्फे अक्कलकुवा येथील रहिवासी बबीता आणि तळोदा येथील लक्ष्मण यांच्यात कलह निर्माण झाला. बबीता यांनी तक्रार अर्ज दिला होता. दोघांना दोन मुले देखील आहेत. दोघांमधील वादाचे कारण संशय होता.
समुपदेशनातून हा संशय दूर करण्यात आला. अक्कलकुवा येथील समुपदेशक आयशा शेख, भारती पाडवी यांनी समुपदेशन केले. बबीता यांनी पती लक्ष्मण यांना पोलिस स्टेशन मध्ये पेढा भरवित घरी जाण्याचा संकल्प केला. महाराष्ट्र राज्य महिलाआयोगाचे जिल्हा समन्वयक राहुल जगताप यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment