नंदुरबार जिल्ह्यात एकुण ३५५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक सुरु असून संपुर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागु आहे.

राज्य निवडणूक आयोग यांचेकडील दिनाक १२/०८/२०२२ रोजीच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यातील ७४ व नंदुरबार तालुक्यातील ७५ अशा एकुण १४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम सुरु असुन. दिनांक १८/०९/२०२२ रोजी मतदान होणार आहे. 

तसेच राज्य निवडणूक आयोग यांचेकडील दिनाक ०७/०९/२०२२ रोजीच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकुवा तालुक्यातील ४५, अक्राणी तालुक्यातील २५, तळोदा तालुक्यातील ५५ व नवापूर तालुक्यातील ८१ अशा एकुण २०६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. व सदर निवडणूकीसाठी दिनांक १३/१०/२०२२ रोजी मतदान होणार आहे. नंदुरबार जिल्हयात वरील दोन्ही निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण एकंदरीत ३५५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या दिनांकापासूनच आचारसंहिता लागू झालेली आहे.

आचारसंहिता बाबत राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक ०६/०९/२०१७ च्या आदेशान्वये ज्या जिल्ह्यामध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत, त्या संपुर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहील असे निर्देश आहेत. 

नंदुरबार जिल्ह्यात एकुण ६३९ ग्रामपंचायतीपैकी ३५५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक सुरु असून त्याची टक्केवारी ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे. यास्तव सद्यस्थितीत संपुर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागु आहे, याची सर्व उमेदवारांनी, नागरीकांनी व शासकीय / निमशासकीय कार्यालयांनी नोंद घ्यावी असे आवाहन नायब तहसीलदार सामान्य प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर...

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हा ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रात शैक्षणिक पाहणी दौरा...

नव्या भोई गल्लीत सामाजिक सभागृहाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन