जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेतपाडा उमराणी बु येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न
सातपुड्याचा डोंगराळ भाग म्हणजे निसर्गाचं समृद्ध वरदान निसर्ग पूजक आदिवासी समाजाने हा सांस्कृतिक समृद्ध वारसा जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला अनेक प्रकारची औषधी वनस्पती, दुर्मिळ रानभाज्या या सातपुड्याच्या कुशीत सापडतात. अशाच डोंगरात सापडणाऱ्या भाज्यांचं महोत्सव म्हणजे सातपड्याचे रानभाजी महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेतपाडा उमराणी बु तालुका धडगाव येथे करण्यात आले होते.
या रानभाजी महोत्सवात अनेक रानभाज्याचं दुकाने विद्यार्थ्यांनी मांडली होती. सातपड्याच्या दुर्गम कुशीत या भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्याचे आस्वाद घेण्याची व त्या रानभाज्यांना पाहण्याची संधी सगळ्यांना उपलब्ध व्हावी म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
उमराणी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. आशाताई वंतीलाल पावरा, पंचायत समिती सदस्या सौ. शोभीबाई फत्तेसिंग पावरा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते फत्तेसिंग पावरा यांच्या उपस्थितीत व धडगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र बच्छाव साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभहस्ते या रानभाजी महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे रानभाज्या घरी प्रत्यक्ष तयार करून आणले होते, तर काही भाज्या महोत्सवात प्रत्यक्ष मांडण्यासाठी आणले होते. सदर महोत्सवात पोवाड्या, मुखा, पांढऱ्या, अंबाडी, माटलु, उहल्या, ओह्या (बांबूची भाजी), हेगलो पाला, बंजान भांजी, कुरटुला, आमली भाजी, कुल, खाटली जंगली भेंडी, वादळी, काकडी, कांदे, लसूण, मिरची, वांगे , काकडी, गीलके, कारले अशा अनेक भाज्या महोत्सवात मांडल्या गेल्या.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते पोवाड्या, बांबूची भाजी व खेकड्याची भाजी मुलांनी स्वतः किंवा काही मुले आई वडिलांची मदत घेऊन काही भाज्या या प्रत्यक्षात शिजवून आणल्या होत्या. तर काही भाज्या या लोकांना पाहण्यासाठी व विक्रीसाठी आणल्या होत्या.
यावेळी राजबर्डी बिटाचे शिक्षणाविस्तराधिकरी मा. श्री. डी डी राजपूत साहेब, सिसा बिटाचे शिक्षणविस्ताराधिकारी मा. श्री शिलवंत वाकोडे साहेब व सहपरिवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवासाठी ग्राम पंचायत सदस्य ब्रिजलाल पावरा, राधिका पावरा याही उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित पावरा, सदस्य बटेसिंग पावरा सर, चेतन पावरा, संतोष पावरा, कुशाल पावरा, नटवर पावरा, तेरसिंग पावरा, गोट्या पावरा, अनिल पावरा, राजू पावरा, अमर पावरा , दिलीप पावरा , जात्र्या पावरा अंगणवाडी सेविका, आशा ताई, यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेची बाल संसदेची मंत्रिमंडळ, मुख्यध्यापक श्री रुपेशकुमार नागलगावे , तेगा पावरा सर, दशरथ पावरा सर , श्री लक्ष्मीपुत्र उप्पीन सर व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.
मनोगत
यावेळी धडगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री राजेंद्र बच्छाव साहेब यांनी मनोगत मांडताना शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केलं. रानभाज्या या सातपुड्याचा समृद्ध नैसर्गिक वारसा असून हे नवीन पिढीला माहीत होण्यासाठी असे महोत्सव नियमित भरले जावे. त्यातून भाज्यांची ओळख तर होतेच पण औषधी वनस्पती व त्याचे महत्व समजायलाही खुप महत्वाची भूमिका पार पाडली जाते.
कल्पना पावरा, विद्यार्थिनी (इयत्ता ६वी)
आमच्या घरी नेहमी आई बाबा वेगवेगळे भाज्या आणायचे पण त्यांची नावे मला माहित नव्हते , त्यांना मी नेहमी विचारत होती. शाळेत जेव्हा रानभाजी महोत्सव आहे समजलं तस आईला व बाबांना सांगून जंगलातून विविध प्रकारची भाजी आणली. बाजारात इतर भाज्यांची माहिती मला मिळाली. मी सर्वात जास्त वेगळ्या भाज्या आणल्या होत्या म्हणून मी खूप आनंदी आहे.
Comments
Post a Comment