Posts

Showing posts from February, 2022

फर्स्ट आईडिया इंटरनेशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Image
अक्कलकुवा तालुक्यातील कुबेर पार्क येथील फर्स्ट आईडिया इंटरनेशनल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रम भौतिक शास्त्रातील प्रसिद्ध सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. ईश्वर वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थीना वेगवेगळे प्रयोग करुन विज्ञानातील वनस्पती व प्राण्याविषयी माहिती दिली. शाळेचे प्रिंसिपल नुरेन मकरानी यांनी विद्यार्थीना प्रश्नोउत्तर पद्धति वापरत मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थी, प्रचीता गावीत, रोशन मराठे नित्या चौधरी व पूर्वी चौधरी खुशी चौधरी व देवयानी चौधरी या विद्यार्थ्यांनी विज्ञानातील वेगवेगळे विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार करुन आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी लतिका चौधरी, शकुंतला पाडवी, प्रणाली पाटील, राखी लष्करी, धनश्री जोशी व पूजा लोहार यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले.संस्थाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, उपाध्यक्ष नितिन चौधरी व सेक्रेटरी मनोज चौधरी यांनी कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक गोटूसिंग वळवी यांनी...

नंदुरबार, भाजपकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पुतळ्याचे दहन...

Image
नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मुख्य चौकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पुतळ्याचे दहन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. देशद्रोही दाऊद इब्राहिम प्रेरित महाविकास आघाडी सरकार मधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करून अटक केल्याच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे. राज्यात एसटी कर्मचारी तसेच रोजगार, मजूर कष्टकरी यांचे मोठे प्रश्न असतानाही महाविकासआघाडी सरकार मधील दोषी मंत्र्यांना अटक केल्यानंतर रस्त्यावर येतात हे दुर्दैव आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरूंगात आहे. महा विकास आघाडी सरकार मधील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या विळख्यात आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरत आहे. याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया आंदोलन कर्त्यांनी यावेळी दिली.

नवापूरचा कशिश जिग्नेश शहा एम बी बी एस चा विद्यार्थी युक्रेनहून सुखरूप घरी परतला. भारत देशाच्या झेंड्यात मोठे सामर्थ्य बसवर तिरंगा ध्वज लावल्याने कोणीही अडवलं नाही... सुरक्षित प्रवास.

Image
युक्रेनमध्ये युद्ध परिस्थिती असल्याने विमानतळापर्यंत पोहचणे कठिण होते.मात्र बसवर भारतीय तिरंगा ध्वज लावल्याने आमची बस कोणीही रोखली नाही.भारत देशाच्या ध्वजात मोठे सामर्थ्य आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतात येणे शक्य झालं,नाही तर परतीची वाट कठीण झाली होती,अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे युक्रेनहुन आपल्या घरी परतलेल्या नवापूरच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या कशिश शहा याने!  नंदुरबार जिल्ह्यातील नऊ विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली होती. युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून जिल्ह्यातील नऊ पैकी नवापुर तालुक्यातील कशिश जिग्नेश शहा हा विद्यार्थी घरी सुखरूप परतला आहे. कशिश शहा युक्रेनमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी गेला होता.  युक्रेन रशिया युद्धामुळे युक्रेन देशाच्या बाहेर पडताना ज्या बसने प्रवास करत होते त्या बसवर भारताचा झेंडा लावल्याने आमची बस कोणीही अडवू शकलं नाही. भारत देशाच्या झेंड्यामध्ये मोठे सामर्थ्य व ताकद आहे. कॉलेजच्या सहकार्याने व भारत सरकारच्या ...

28 फेब्रुवारी रोजी भाजपतर्फे जिल्हाभरात अंडरवर्ल्ड डॉनच्या पुतऴ्याचे दहन करून महविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करणार. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी

Image
नंदुरबार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे ऊद्या दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर यासह नंदुरबार शहरात जुन्या नगरपालिकेजवळील चौकात छत्रपती शिवाजी महाराज अर्धपुतळा समोर अंडरवर्ल्ड डॉनच्या पुतऴ्याचे दहन करून देशद्रोही मंत्री मलिक यांना पाठीशी घालणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करण्यात येणार आहे. त्याच बरोबर मुंबईत सिरीयल बॉम्बस्फोट घडवून भारत देशाशी छुपे युद्ध पुकारणाऱ्या देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या टोळीतील हस्तकांशी संबंध प्रस्थापित करणारे मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी जोरदार निदर्शने देखील करण्यात येणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी, तालुका व शहरातील कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्याा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचेेे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी केले आहे. हे आवाहन करताना विजय भाऊ चौधरी यांनी म्हटले आहे की, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ...

म्हसावद येथे एकाच रात्री सहा दुकाने फोडली.चोरट्यांनी पोलीसांपुढे शोध घेण्याचे कडवे आव्हान उभे केले.

Image
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे चोरट्यांनी संधी साधत एकाच रात्रीतून सहा दुकाने फोडली. महिनाभरात हि दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात फोडलेल्या एका दुकानास दुसऱ्यांदा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला. खरे तर सहा दुकाने फोडण्यात आली असली तरी यातून एक रुपयाचीही चोरी झाली नाही. मात्र एका दुकानातून मोबाईल चोरीची नोंद करण्यात आली आहे. चोरट्यांनी केवळ शटर उचकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला की? अन्य काही ? याबाबत नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू होती. असे असले तरी सततच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली असून चोरट्यांनी पोलीसांपुढे शोध घेण्याचे कडवे आव्हान उभे केले आहे.  दुकाने फोडली पण चोरी झाली नाही. यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचे बोलले जात आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा धाडसी दुकान फोडी झाल्यावर म्हसावद पोलीसांचे गावातील रात्रीच्या गस्तीवर दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीतून सहा दुकाने फोडली पण चोरीच झाली नाही हा पण आश्चर्याचा भाग आहे. सहा दुकानात पैकी पाच हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरी झाल्याची तक्...

नंदुरबार, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन...

Image
नंदुरबार जिल्हा परिषद क्रीडा उत्सव 2022 मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित मैदानी विविध खेळांच्या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एडहोकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा राठोड, माध्यमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर युनूस पठाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत  दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.  मैदानी खेळांमध्ये जिल्हा परिषद मुख्यालय व सहा तालुक्यांच्या स्पर्धा भरवण्यात आल्यात त्यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्डी, खो-ख...

उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी झाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी रस्त्यावर उतरून केली वाहतूक सुरळीत उपाययोजना करावी-विजय चौधरी

Image
शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहतूक शहर उड्डाणपूलमार्गे वळविण्यात आली आहे. परंतु आज 26 फेब्रुवारी रोजी वाहतुकीची वर्दळ वाढल्याने उड्डाणपुलावर तब्बल अर्धा ते एक तास वाहतूकीची कोंडी झाली. या वाहतुक कोंडीत वाहन चालक अडकल्याने गांधी पुतळा ते उड्डाणपुलावरून काकाच्या डाव्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकी  कोंडी झाल्याचे पाहून भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री.विजयभाऊ चौधरी यांनी तात्काळ रस्त्यावर उतरून मार्गदर्शन करीत वाहतुकीची सुरुळीत केली.  विजयभाऊ चौधरी यांनी तब्बल अर्धा तास थांबून स्वतः वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आणि या वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला ही मार्ग करून दिला. यामुळे विजय भाऊ चौधरी यांच्या  प्रयत्नांमुळे कोंडी झालेली वाहतूक काही वेळेतच पूर्ववत सुरळीत झाली. नंदुरबार शहरातील सुरत- भुसावळ लोहमार्गावरील नळवा रस्त्यावरील पुलावर रेल्वे बोगद्याचे काम सुरू आहे.  या कामाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आले असून ती पर्यायी मार्ग म्हणून शहर उड्डाणपूलमार्गे वळविण्यात...

नंदुरबार पालिकेकडून १ मार्चपासून कर वसुलीसाठी धडक मोहीम; कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार- माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Image
कोरोनाचे संकट आता बऱ्यापैकी निवळले आहे. व्यवसायिक,नोकरदारांचे आर्थिक चक्र पूर्वपदावर आले असून, मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकीदारांनी वेळेत कराचा भरणा करावा. कर वसुलीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ रोखण्यात येईल असा इशारा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला. नंदुरबार नगरपालिकेची मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने होऊ शकली नाही. थकबाकीदारांना पालिकेतर्फे वेळोवेळी नोटीस देऊन देखील कराचा भरणा करण्यात येत नसल्यामुळे कोट्यवधींची थकबाकी दिसून येत आहे. पालिकेच्या स्व.भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवार (दि.२६)फेब्रुवारी रोजी दुपारी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे,तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, बांधकाम सभापती राकेश हासानी,फारुख मेमन,किशोर पाटील उपस्थित होते. यावेळी माजी आ.रघुवंशी म्हणाले, वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी...

बोरवण शाळेचे आदर्श शिक्षक दिलीप गावित यांचा अनोखा उपक्रम. शिक्षणासह स्वच्छतेचे धडे. विद्यार्थ्यांची केस कटिंग.

Image
नवापुर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरवण येथे कार्यरत शिक्षक दिलीप गावित नेहमीच शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे काम करत आहे. कोरोना काळातही त्यांनी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासमाला देऊन शिक्षणाचा गाडा कायम राखला होता. एक फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या असून बोरवण गावातील अनेक विद्यार्थ्यांचे पालक ऊसतोड, वीट भट्टी तसेच टोपल्या विणण्याचे काम करतात. हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांना शिकवण्याची धडपड असतानाच शाळेला दिलीप गावित सारखे आदर्श शिक्षक लाभल्याने विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाचं मार्गदर्शन केले जात आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी नियमित नखे कापणे, दररोज सकाळी दात घासणे, आंघोळ करणे, मुलींनी केस विसरूनच शाळेत यावे याबाबत मार्गदर्शन केले विशेष म्हणजे शाळेत आलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे केस जास्त वाढलेले होते. त्या विद्यार्थ्यांचे शिक्षक दिलीप गावित यांनी शाळेतच केस कटिंग करून विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. शिक्षक दिलीप गावित यांच्...

प्रा.शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या पारदर्शक करा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रहार शिक्षक संघटनेने निवेदन

Image
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी बदलीसाठी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय ऑनलाईन, पारदर्शक होणेबाबत विनंतीपूर्वक निवेदन नवीन बदली शासन निर्णयातील दि.७/४/ २०२१ रोजीच्या निकषांप्रमाणे अवघड क्षेत्र निश्चित करतांना मागील २०१८ व २०१९ वेळीचे अवघड क्षेत्र कायम ठेवण्यात यावे. नंतर प्रशासनास उचित वाटेल व नवीन बदली धोरण निकषांनुसार येणारी गावे अवघड करावीत. या प्रक्रियेत पारदर्शकता व वस्तुनिष्ठता जपावी. तसेच अवघड क्षेत्र निवडल्यानंतर अंतिम करण्यापूर्वी जाहीर करावे व हरकती घेण्यास चार दिवसांचा वेळ द्यावा. बदली पोर्टलला चुकीची माहिती अपडेट करुन शासनाची दिशाभुल करुन बदलीचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. बदली पात्र शिक्षकांची अवघड व सोपे असे क्षेत्रनिहाय सेवाज्येष्ठतेनुसार यादी जाहीर करणे. बदली प्रक्रियेपूर्वी समाणिकरणासाठ...

तळोदा तालुक्यातील धवळी विहीर जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शिक्षण परिषद संपन्न

Image
केंद्र तळोदा अंतर्गत सर्व शाळांची शिक्षण परिषद माहे फेब्रुवारी 2022 जिल्हा परिषद शाळा धवळी विहीर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. परिषदेचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सपनाताई वसावे यांनी भूषवले. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी माननीय श्री शेखर धनगर साहेब व केंद्रप्रमुख श्रीमती जयस्वाल मॅडम उपस्थित होत्या. तसेच श्री सुकलाल पावरा(केंद्रप्रमुख,केंद्र चीनोदा), श्री जगन्नाथ मराठे( केंद्रप्रमुख ,केंद्र मोदल पाडा), ज्ञानप्रकाश फाऊंडेशन प्रतिनिधी ,श्री पवार सर( गटसाधन केंद्र,तळोदा)  उपस्थित होते.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.   उपस्थित सर्वांचे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशा व लेझीम पथकाने नृत्याविष्कार दाखवत स्वागत केले. तसेच ईशस्तवन व स्वागत गीत कृतीयुक्त गितातून घेण्यात आलेत.     जिल्हास्तरावरून दिलेल्या नियोजनानुसार शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच चर्चा घडवून आणण्यात आली. माननीय धनगर साहेब यांनी विद्यार्थी आनंदात शिक्षण घ...

रविवार 27 फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 89 हजार बालकांना देणार पोलिओ डोस

Image
 राष्ट्रीय पोलिओ निमुर्लन कार्यक्रमातंर्गत रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी नंदूरबार जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजीत करण्यात आली आहे. या मोहिमेची जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तयारी करण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासुन वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.   या मोहिमेसाठी जिल्ह्यातील बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी लागणारी बायोव्हलेंन्ट पोलिओ लस २ लाख 61 हजार प्राप्त झाली आहे. शितसाखळी अबाधित ठेऊन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना लस पोहोचविण्यात आली आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील 1 लाख 89 हजार 162 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. मोहिमेसाठी २ हजार 2 लसीकरण केंद्राचे नियोजन केले असून प्रत्यक्ष बुथवर डोस देणे, बालकांना बोलावुन आणणे यासाठी  4 हजार 853 कर्मचारी कार्यरत असणार आहेत.  या मोहिमेचे 502 अधिकारी, कर्मचारी यांचेमार्फत पर्यवेक्षण केले जाणार असून जिल्ह्यातील ६ तालुक्यांचे पर्यवेक्षणासाठी स्वंतत्र 6 अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आल...

नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भव्य दंत व सर्व रोग निदान शिबीर संपन्न

Image
  नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भव्य दंत व सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटन देवमोगरा मातेचे पुजन करुन व दिप प्रज्वलन करुन नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ हिना गावीत,आमदार विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नंदुरबार जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ मनिषा खञी,तहसिलदार मंदार कुलकर्णी,जिल्हा शल्यचित्सक डॉ चारुदत्त शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गोविद चौधरी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनिषा वळवी,नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ शशीकांत वसावे,भाजपचे जिल्हा अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,कृणाल दुसाने,सौरव भामरे आदी उपस्थित होते. प्रसंगी खासदार डॉ हिना गावीत म्हणाल्या की कोणत्याही आजाराची तपासणी केली पाहीजे.यामुळे आपल्याला कोणता आजार आहे हे समजते.पाले भाज्याचे सेवन केल्याने रक्तवाढ होत असते नंदुरबार जिल्हात कुपोषणचे प्रमाण जास्त असल्यामुळे अशा रुग्णानी वेळो वेळी वैद्यकीय तपासनी करणे गरजचे आहे.गरोदर मातानी आपले नाव प्रामथिक आरोग्य केंद्रात नाव नोंदवले असता त...

नंदुरबार, महा विकास आघाडी तर्फे केंद्रीय भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने. भाजपा हमसे डरती है ईडी को आगे करती है...

Image
  नंदुरबार शहरातील गांधी पुतळा चौकात जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत निषेध करण्यात आला.  यावेळी माजी आमदार व शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेस जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे व महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कडून कवडीमोल भावाने जमिनी विकत घेतल्या प्रकरणात केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने चौकशी करून अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.  यावेळी भाजपा हमसे डरती है ईडी को आगे करती है. केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. नवाब मलिक तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है. अशा आशयाचा घोषणा देऊन केंद्रीय भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. एकूणच गेल्या काही काळापासून केंद्रीय भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी द्वारे चौकशी...

इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार

Image
    उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. 05 एप्रिल आणि दि. 07 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा दि. 04 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये उपरोक्त प्रमाणे बदल करण्यात येत आहे.   यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार शनिवार दिनांक 05 मार्च 2022 रोजी प्रथम सत्रात होणारी हिंदी विषयाची तसेच द्वितीय सत्रात होणारी जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन विषयांची परीक्षा आता मंगळवार दिनांक 05 एप्रिल 2022 रोजी नियोजित वेळेत होईल. तर, सोमवा...

आ.डॉ विजयकुमार गावित यांचे समर्थक शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल.

Image
 नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल; आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समावेश आ.डॉ विजयकुमार गावित यांचे समर्थक मानले जाणारे तसेच जेष्ठ नेते स्व. व्यंकटराव पाटील यांचे सुपुत्र शेखर पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पूर्व भागातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेखर पाटील यांनी तालुक्यातील पूर्व भागातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज मंगळवार (दि. 22) रोजी जाहीर प्रवेश केला. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधुन स्वागत केले.यावेळी कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विजय असो अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हिरालाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.शिवाजीराव मोरे,किशोर पाटील,नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक दीपक दिघे, अशोक राजपूत,धर्मेंद्र परदेशी,अंबु पाड...

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील नंदुरबार जिल्हा पोलीस विभागाच्या वार्षिक कामकाज तपासणी दौऱ्यावर.

Image
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी. जी.शेखर पाटील हे नंदुरबार जिल्हा पोलीस विभागाच्या वार्षिक कामकाज तपासणी कामासाठी आले असता त्यांनी नंदुरबार येथील शहर पोलीस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात आणि तालुक्यात विविध गुन्हयातील फिर्यादीचे कोणाचे पैसे गहाळ झाले तर कोणाचे मोबाइल चोरीस जाणे गहाळ झाले तसेच आश्रम शाळेतून लॅपटॉप चोरी झाली या सर्व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच कर्तव्यावर दक्ष असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावून ते परत केले तसेच पोलीस दलातील एक कर्मचारी आपले कर्तव्य बजावून घरी परतत असताना अपघातात पोलीस कॉन्स्टेबल स्व.निलेश पावरा याचे दुखद निधन झाले त्याच्या कुटुंबीयांस 6 लक्ष 53 हजार 737 रुपयांचे सानुग्रह अनुदान पोलीस विभागाकडून देण्यात आले याबाबत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी नंदूरबार जिल्हा पोलीस प्रशासनाने या केलेल्या विशेष कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले यावेळी त्यांनी सांगितले की मागील चार ते पाच महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या गुन्ह्यातील तपासणी अत...

23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार याचेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने 23 ते 25 फेब्रुवारी 2022 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामधील मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तसेच भ्रमणध्वनीद्वारे घेण्यात येणार आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.  नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल.  तो वापरुन पोर्टलवर लॉगीन करावे. त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मधील दिसणाऱ्या रोजगार म...

मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांची मागणी

Image
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकारातील गुन्हेगार सरदार शहावली खान व कुख्यात दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकरचा हस्तक मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल कडून करोडो रुपयांच्या मोक्याच्या जागेची कवडीमोल दराने खरेदी केली होती. मंत्री नवाब मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी आर्थिक संबंध असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर रोजी केला होता. श्री देवेंद्र फडवणीस यांनी आणखी चार मालमत्तेचे प्रकरणे ईडी कडे चौकशीसाठी दिले होते याबाबत श्री.देवेंद्र फडणवीस यांनी मालिकांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचे पुरावे ईडी कडे तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे देखील दिले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून अल्पशा दराने मंत्री नवाब मलिक यांनी जमिनी खरेदी केल्या होत्या या जमिनीची किंमत करोडो रुपयांनी होती. बॉम्बस्फोट आरोपी व दाऊदशी घनिष्ट संबंध असल्याचे देखील संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी आज सकाळपासून मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले होते. चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून नवा...

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते खत वापर जनजागृतीच्या प्रचार वाहनाचा शुभारंभ

Image
सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग तसेच आर सी फर्टीलायझर्स प्रा.लि.तर्फे तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे, कृषी उपसंचालक व्ही.डी.चौधरी, मोहिम अधिकारी एम.जी.विसपुते, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक एन.डी.पाडवी, कृषि अधिकारी वाय.एस.हिवराळे, आर.सी.फर्टीलायझर्स कंपनी प्रा.लि.चे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. मोहिमेअंतर्गत एसएसपी खताच्या वापराबाबत  शेतकऱ्यांमध्ये जनजागृती नसल्याने शेतकरी एसएसपी खताच्या फायद्यापासून वंचित राहत आहेत. तीन  बॅग एसएसपी आणि एक बॅग डिएपी यांच्यासाठी शेतकऱ्यांना सारखीच रक्कम खर्च करावी लागते आणि साधारण सारख्याच प्रमाणात स्फुरदाची मात्रा पिकांला मिळत असते आदी विविध बाबींसंदर्भात जनजागृती  या चित्ररथा मार्फत करण्यात येणार आहे. 

होस्टेलमध्ये प्रवेशासाठी सात हजारांची मागणी करणाऱ्या आदिवासी विकास प्रकल्पाचा लाचखोर कनिष्ठ लिपीकास रंगेहाथ अटक: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Image
तळोदा तालुक्यातील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पाचे कनिष्ठ लिपीक 5 हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाचखोर लिपीक किशोर भरतसिंग पावरा यास रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार तळोदा येथील महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेत असून ते आदिवासी समाजाचे असून त्यांना शासनाने विनामुल्य शासकीय होस्टेल तळोदा येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तक्रारदार व त्यांचे मित्रांनी तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात होस्टेलला प्रवेश मिळविण्याकरीता ऑक्टोंबर 2021 ला ऑनलाईन फॉर्म भरले होते. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये होस्टेलमध्ये प्रवेश संबंधिची लिस्ट लागली होती. त्यात तक्रारदार व त्यांच्या मित्राचे नाव नव्हते. त्यानंतर दि.17 फेबु्रवारी रोजी सायंकाळी तक्रारदार यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयातील लिपीक पावरा यांचा फोन तक्रारदार यांना आला व पैश्‍यांची मागणी केली असता आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे लिपीक किशोर पावरा यांनी पंचसाक्षीदारांसमोर 7 हजार रूपये लाचेची मागणी केली मात्र तडजोडीअंती 5 हजा...

तळोदा आमदार कार्यालयात आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बूथ संपर्क अभियान कार्यक्रम.

Image
तळोदा येथे आमदार कार्यालय तळोदा येथे मा.आमदार श्री राजेश दादा पाडवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बुथ संपर्क अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाला मा.पंकज पाठक, सदानंद रघुवंशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नारायण दादा ठाकरे-विधानसभा प्रभारी, दारासिंग वसावे-आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष, चेतन गोसावी-युवा मोर्चा ता.अध्यक्ष, प्रदिप शेंडे-ओबीसी अध्यक्ष, माजी भाजपा ता.अध्यक्ष यशवंत पाडवी,जि.प.सदस्य भरत पवार, प.स.सदस्य विजय राणा,अनिल पवार,विक्रम पाडवी व गोपी पावरा यांनी केले. संपर्क बुथ अभियानात शक्ती केंद्र अध्यक्ष व प्रभारी उपस्थित होते.

बी. जे. पावरा सरांचे "महाराष्ट्र सेट परीक्षेत मराठी विषयात" प्राविण्य यश संपादन, कौतुक व अभिनंदन.

Image
नंदनगरीतील सातपुड्याच्या कुशीत वसलेले निगदी गावातील गरीब शेतकरी कुटुंबातील श्री. बी.जे.पावरा यांनी नुकत्याच सप्टेंबर महिन्यात झालेल्या राज्य स्तरावरील "महाराष्ट्र सेट परीक्षेत मराठी या विषयात" प्राविण्य मिळविले. श्री भानुदास.जे.पावरा सर हे नंदुरबार येथील नंदुरबार तालुका विधायक समिती शिक्षणशास्त्र विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.तसेच ते अगोदर शिक्षणशास्त्र मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांनी दोन विषयांत एम.ए. केले आहेत,व केंद्रीय सी.टी.ई.टी. ,एम.एड्., डी. एस.एम. अशा विविध पदवी व पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. ते उत्कृष्ट तंत्रस्नेही म्हणून प्रख्यात आहेत. श्री भानुदास.जे.पावरा यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल नं.ता.वि. समितीचे अध्यक्ष मा.आ. चंद्रकांत रघुवंशी व उपाध्यक्ष मा. मनोज रघुवंशी,  प्राचार्य श्री मुकेश रघुवंशी व समाजाच्या सर्वच स्तरावर कौतूक व अभिनंदन होत आहे.

डोळस तरुणीचा अंध युवकाशी विवाह म्हणाली "माझ्या डोळ्यांनी मी त्यांना जग दाखवेन"

Image
डोळस तरुणीने एका अंध तरुणाशी लगीनगाठ बांधून समाजापुढे एक आदर्श उभा केल्याचे नुकत्याच पार पडलेल्या विवाह सोहळ्यातून पहायला मिळाले. तीन दृष्टिहीन भावाबहिणींपैकी दोघा भावांशी डोळस मुलींनी विवाह केल्याने हा विवाहसोहळा विशेष चर्चेत आला. नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीला मध्यप्रदेश राज्यात पानसेमल तालुक्यातील मलफा टेम्बली येथे हा सोहळा पार पडला.  नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीला वेश असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल तालुक्यात खेतीया गावापासून जवळच असलेल्या आदर्श गाव टेमली येथे शनिवारी एक अनोखा विवाहसोहळा पार पडला.  सामान्य (दृष्टीहीन नसलेल्या) वधूने एका अंध वराशी लग्न केले.  दोन्ही परिवारांच्या संमतीने हा विवाहसोहळा पार पडला.  टेमली येथील रहिवासी सौ. किरण व श्री. आनंदा भीमराव मोहने यांना दोन मुले व एक मुलगी असे तीन अपत्ये असून, तिनही दृष्टिहीन आहेत. या सर्वांचे पालन पोषण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे अशक्य काम मोहने परिवाराच्या नशिबी आले. मात्र दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना शासकीय नोकरी मिळवून देण्यात हे दाम्पत्य यशस्वी झाले. या मुलांन...

इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे रयतेच्या राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा.

Image
नंदुरबार येथील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवछत्रपतींच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला. नंदुरबार शहरातील इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षीही शिवजयंतीनिमित्त प्रतिमापुजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर परिसरातील शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याला जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, माजी नगराध्यक्ष रविंद्र परदेशी, इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्या हस्ते रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी जि.प.बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, वाहतुक पोलिस निरीक्षक राजेंद्र भावसार, इस्...

राज्याच्या शेवटच्या टोकावरील धडगाव शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी.

Image
  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र शिवप्रेमींनी शिवरायांच्या जयघोषाने दणाणून सोडला आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावरील धडगाव तालुक्यातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव साजरे करण्यावर शासनाचे निर्बंध असल्याने मुकावे लागत होते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पाचशे नागरिकांना एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याची परवानगी शासनाने दिल्याने सर्व ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धडगाव शहरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने हनुमान मंदिराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला त्रिवार मुजरा करून "शिवाजी महाराज की जय" 'जय भवानी जय शिवाजी' असा जयघोष करून शिवजयंती साजरा करण्यात आली. यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य दीपक कलाल, महेंद्र शिवदे, रमाकांत शिंपी, धनराज ढोले, रवींद्र तावडे, रवींद्र पोतदार, सुनील मोरे, जितेंद्र ढोले, हर्षल रामोळे, भरत साठे, रुद्रेश ढोले...

दलेलपूर माध्यमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिवजयंती उत्साहात साजरी.

Image
  तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.  यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान द्वारे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल आदरपूर्वक भाषण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडलेत.  शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील गाण्यांवर नृत्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणला.   सदर कार्यक्रमाला उपस्थित शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राजु प्रधान, सदस्य संतोष मराठे, अजय धानका कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यधापिका सोहनी मॅडम, शिक्षक वृंद व पालक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन महाजन सरांनी केले तर लिवा तडवी सरांनी आभार व्यक्त केले.

राज्यात सर्वात मोठा पोल्ट्री हब असलेल्या नवापूर तालुक्यात राज्यातील इतर ठिकाणचा बर्ड फ्ल्यूचा धोका पाहता उपाय योजनांना वेग

Image
महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा पोल्ट्री हब असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील नवापूर तालुक्यातील व्यावसायिकांचे बर्ड फ्लूमुळे गेल्यावर्षी कंबरडे मोडले होते. त्यातून सावरत पोल्ट्री व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला असून, त्यातून उत्पादन सुरू झाले असले तरी संपूर्ण पोल्ट्री व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु न होताच महाराष्ट्रातील इतर भागात बर्ड फ्ल्यूचा धोका पाहता येथील पोल्ट्री मालकांकडून भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापुर मध्ये बर्डप्ल्युच्या शिरकावा नंतर नंदुरबार मध्ये प्रशासन अलर्ट झाल असुन सतर्कतेच्या अनुशंगाने साऱया उपाय योजना केल्या जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर मध्ये अवघ्या वर्षभरापुर्वी बर्डप्ल्युचा शिरकाव झाला होता. यामुळे 30 पोल्ट्री फार्म मधील जवळपास 9 लाख कोंबड्यांची कलिंग प्रक्रीया राबविली होती. तर 60 लाख अंडी नष्ट करण्यात आली होती. शासनाच्या परवानगी नंतर ऑक्टोंबर 21 मध्ये याठिकाणचा पोल्ट्री व्यवसाय पुन्हा सुरु झाला असुन दिवसाकाठी आता पाच ते सात लाख अंड्याचे उत्पादन घेतलं जात आहे. त्यामुळे याठिकाणी पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार पाहता प्रशासनाने ख...

शिवजयंती विशेष शिरीषकुमार मंडळातर्फे मंगलाष्टकापूर्वी वधू-वरांच्या हस्ते शिवपुजन.

Image
  नंदुरबार येथील बालवीर चौक नवा भोईवाडा परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त मंगलाष्टके होण्यापूर्वी हळदीच्या अंगाने वधूवरांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. नंदुरबार येथील गवळीवाडा भागातील संतोष देमाजी घुगरे यांची सुकन्या चि. सौं. का. भाग्यश्री आणि धुळे मोगलाई येथील राजेंद्र बिडकर यांचे चिरंजीव विवेक यांचा विवाह दिनांक 19 रोजी होता. वधु वरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी आणि अक्षदा पडण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिवपुजन केले.  शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून वधू-वरांच्या हस्ते शिवपूजन करण्यात आले. याप्रसंगी बालवीर चौकात शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा आणि भगवे ध्वज यांनी परिसर सजविण्यात आला होता. ध्वनिक्षेपकावर छत्रपती शिवरायांचे पोवाडे आणि गीताने चैतन्य निर्माण झाले होते. शिवपूजन कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, धुळे येथील संदीप बिडकर, गणेश बिडकर, बोरविहीर येथील कीटकनाशक प्रतिनिधी राजेन्...

नवापूर एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीने शिवजयंती साजरी. १०४ वा दु:खवटा दिवस

Image
संपूर्ण महाराष्ट्रभर गेल्या साडेतीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्र शासनात एसटी कर्मचारी विलीनीकरणासाठी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपात महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या महत्त्वाच्या नवापूर बस बसस्थानकातील एसटी कर्मचारी देखील या संपात सहभागी आहे गेल्या साडेतीन महिन्यात प्रत्येक सण, उत्सव जयंती, पुण्यतिथी या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी साजरे केले आहे. आज महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या लढाऊ व शूरवीर प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कष्टकऱ्यांचा दुखवटा देखील साजरा केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर संपकरी ठाम असून कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.  शिवजयंती साजरी करुन छत्रपती प्रमाणे लढाऊ व शूरवीर शक्ती आम्हालाही प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावेळी वरिष्ठ कर्मचारी आहिरे मामा, कैलास वळवी, जगशिग वळवी, विवेक वसावे, महादेव आत्राम, महादेव कराड, मनोज गावित, रवी मराठे सचिन महा...

शिरपूर, कोडीद येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

Image
  महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक 'युगपुरुष', रयतेसाठी आयुष्य वेचणारे, अन्यायाविरूद्ध लढा देणारे, कुशल प्रशासक व आदर्श राज्यकर्ते,  स्वराज्य संस्थापक, अखंड भारताचे आराध्यदैवत, शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व त्यांचा इतिहास विसरता कामा नये. त्यांनी केलेलं कर्तृत्व आणि त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आपण सर्वांनी अविरतपणे काम करावे  छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व सर्वप्रथम जगासमोर आणण्याचे काम महात्मा जोतीराव फुले यांनी केले. त्यांनी रायगडावरील महाराजांची समाधी शोधून काढली पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केली.  त्यांचे हे कार्य अविरत पुढे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. स्वराज्याची आदर्श कल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. त्यांनी केलेले कार्य सर्व समाजाला प्रेरणा देणारे आहे.     हीच प्रेरणा घेऊन कोडीद ता.शिरपूर येथे दरवर्षीप्रमाणे ...

तळोदा तालुक्यातील तळवे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साज

Image
लढाऊ शूरवीर अख्या महाराष्ट्राचे दैवत समजल्या जाणाऱ्या शिवरायांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात आज विविध ठिकाणी शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली. शहादा तालुक्यातील तळवे येथे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नारायण ठाकरे शहादा तळोदा विधानसभा प्रभारी मंगेश मराठे उपसरपंच कांतीलाल साळुंके तंटामुक्ती अध्यक्ष राकेश मराठे व ग्रामस्थ उपस्थित होते.

विसरवाडी, लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल लीनेश पाडवी, राजू कोकणी यांचा 5101 रुपयांचे बक्षीस देऊन गौरव...

Image
कैलास पाडवी रिपोर्ट. नवापुर तालुक्यातील पानबारा आश्रमशाळेतील चोरी झालेल्या 22 लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्याचा विसरवाडी पोलीसांनी दोन दिवसातच तपास करून चोरी झालेले लॅपटॉप हस्तगत केले होते. विसरवाडी पोलिसांच्या जलदगती कार्यवाही बाबत पानबारा शाळा प्रशासनानेही विसरवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला होता.  विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी लॅपटॉप चोरीच्या गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल लीनेश पाडवी यांना पाच हजार एकशे एक रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच सहकारी पोलीस कॉन्स्टेबल राजू कोकणी यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्याने कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहे. यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

'शिव जयंती' रांगोळीच्या माध्यमातुन शिवाजी महाराजांची पाच हजार स्वेअरफिट मध्ये प्रतिमा साकारली

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शहाद्यातील एका तरुणीने रांगोळीच्या माध्यमातुन शिवाजी महाराजांची पाच हजार स्वेअरफिट मध्ये प्रतिमा साकारली आहे.  बी फार्मसी ची विद्यार्थीनी असलेल्या वैष्णवी पाटीले हिने शहादा कृषी उत्पन्न  बाजारा समितीच्या आवारात तब्बल 96 तासांच्या मेहनतीनंतर हि प्रतिमा साकारली आहे. यासाठी तिने सहा ते सात क्विंटल रांगोळीचा वापर केला असुन चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर रागोळीचे चित्र पुर्ण झाले आहे. पहिल्यांदाच इथक्या मोठ्या प्रमाणात रांगोळीमधुन शिवरायांची प्रतिमा साकारली गेली असल्याने शिवप्रेमी देखील हि रांगोळी पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थिती लावत आहे.

चोरीला गेलेल्या २२ लॅपटॉपचा दोन दिवसात छडा लावल्याने शाळेतर्फे विसरवाडी पोलिसांचा सत्कार.

Image
गुन्ह्यातील आरोपी सापडत नसेल तर पोलिसांना दोष दिला जातो.एखाद्या गुन्ह्याचा उकल तात्काळ केल्याने पोलिसांचे कौतुक देखील झाले पाहिजे या उद्देशाने पानबारा शालेय प्रशासनाने पोलिसांचे कौतुक केले. नवापुर पोलिसांनी तीन जिल्हा परिषद शाळेतील चोरीचा अजून शोध लावला नाही त्यांनी देखील विसरवाडी पोलिसांचा आदर्श घेत शोध लावावा अशी चर्चा शैक्षणिक क्षेत्रात बोलली जात आहे.  नवापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा येथे 12 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्री सोनखांब अनुदानित आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेतील 21 लॅपटॉप लंपास केले होते. आश्रम शाळेतील मुख्याध्यापक सह शिक्षक कर्मचारी चिंतेत होते. मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने सहाजिकच शिक्षकांची चिंता वाढली होती. या दरम्यान विसरवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी आश्रम शाळेतील शिक्षकांना दोन दिवसात तुमचे लॅपटॉप शोधून देतो. असे आश्वासन दिल्याने दोन दिवसातच विसरवाडी पोलिसांनी लॅपटॉप चोरट्यांचा शोध घेत कारवाई पार पडल्याने पानबारा आश्रम शाळेतील मुख्याध्यापक पी. पी. वसावेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विसर...

उपराष्ट्रीय टीबी मुक्त भारत वार्षिक सर्वेक्षणास नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात.

Image
  केंद्रिय क्षयरोग विभाग (सीटीडी), आयसीएमआर नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च ईन टिबरक्युलॉसेस (आयसीएमआर-एनआयआरटी), आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ एपिडिमोलॉजी (आयसीएमआर-एनआयई), इंडियन असोसिएशन फॉर प्रिव्हेंटिव्ह अॅण्ड सोशल मेडिसिन (आयएपीएसएम), जागतिक आरोग्य संघटनेचे देश कार्यालय, भारत (डब्ल्यूएचओ) या संस्थांच्या सहयोगाने टिबी मुक्त भारत वार्षिक सर्वेक्षणास आज नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, यांच्या हस्ते रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून उपराष्ट्रीय टीबी मुक्त भारत (Sub National Certification) वार्षिक सर्वेक्षणास आज नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली या वेळी मा. क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, जागतिक आरोग्य संस्थेचे सल्लागार डॉ. हर्षद लांडे, क्षयरोग विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. शिरीष भोजगुडे, नगरसेवक प्रशांत चौधरी, हाशीम शहा, शाबीर बागवान व जिल्हा क्षयरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वाकांक्...

मॅक्स बोलेरो गाडी ४० फुट खोल दरीत कोसळल्याने ९ जण जखमी.

Image
शहादा तालुक्यातील नागझीरी गावाजवळ प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स बोलेरो गाडी खोल दरीत कोसळल्याने कोठबांधणी येथील नऊ जण जखमी झाले असून अपघातात दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने नंदुरबार जल्हिा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर म्हसावद ग्रामीण रूग्णालयात ऊपचार सुरू आहेत. कोटबांधणी येथून मॅक्स बोलेरो गाडी क्र.एम.एच. ७३८९ ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी शहादाकडे प्रवासी बसवून आणत असताना नागझीरी गावाजवळ उमरापाणी फाट्यालगत ऊतारावर चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने ४० फुट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आपल्या कर्मचाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले होते. सदर अपघातात आबला नानका भील, टेंबलीबाई हेलक्या भील, पाण्या पाणसिंग शिंदे, सोन्या आबल्या भील, वसंतीबाई आबला भील, हिराबाई सोन्या भील, आपसिंग साव-या भील, लाडकीबाई आपसिंग भील, एकट्या अजय भील हे जखमी झाले. पैकी दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जल्हिा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमींवर म्हसावद ग्रामीण रूग्णालयात डॉ. अल्लउद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाख...

काँग्रेस पक्षाचे भाजप खासदारांच्या घरासमोरील आंदोलन जमाबंदीमुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर.

Image
नंदुरबार काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे . खऱ्या अर्थाने कोरोना पसरविण्याचे पाप हे मोदी सरकारनेच केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अपमानीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मांगावी, याकरीता भाजपाचे नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावीत यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार होते परंतु जिल्ह्यात जमाबंदी असल्यामुळे पोलीस प्रशासनाने विनंती केल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे खा. हिना गावित यांच्या घरासमोर होणारे आंदोलन रद्द करण्यात येऊन, हे आंदोलन काँग्रेस कार्यालयाबाहेर करण्यात आले, परंतु भविष्यात जेव्हा जमाबंदी रद्द होईल तेव्हा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी बोलताना सांगितले. यावेळी काँग्रेस कमि...

उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची भेट

Image
उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील आस्थापना विभाग, संगणक कक्ष, अभिलेख कक्षाची पाहणी केली. तसेच शेत जमीन, बिनशेती मोजणी,मिळकत पत्रिकेचे संगणकीकरण, आकार बंध, टिप्पण बुक, प्रतिबुक, वसलेवार, नगर भू -मापनाकडील मोजणी आलेख,नकाशे, अधिसूचना,गावठाण भूमापनाचे ड्रोन सर्वेक्षण तसेच भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी स्वाती लोंढे, उपअधीक्षक स्मिता गावीत, शिरस्तेदार प्रविण दुसाने तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.